तीर्थक्षेत्र आळंदी शहराच्या भोवताली खड्ड्यांचा फास
आळंदी, ता. २ : शहरात प्रवेश करण्यासाठी येणारे लोणीकंद- मरकळ रस्ता, चाकण- आळंदी,च-होली बाह्यवळण मार्ग आणि देहूफाटा चौक या भागात सध्या खड्ड्यांमुळे वाहनचालक मेटाकुटीला आले आहे. आळंदीभोवतालच्या रस्त्यांना खड्ड्यांचा फास आवळल्याचे चित्र आहे. चऱ्होली बाह्यवळण मार्ग आणि मरकळ-लोणीकंद रस्त्याने येजा करणार्या वाहनांना अर्ध्या तासाच्या अंतराऐवजी आता दीड ते दोन तासांचा प्रवास करावा लागत आहे. परिणामी विद्यार्थी उद्योजक याचा नाहक वेळ खर्ची जात आहे.
आळंदी राज्यातील मोठे तीर्थक्षेत्र आहे. त्यातच आळंदी परिसरात मरकळ, धानोरे भागात छोटीशी औद्योगिक केंद्र आहे. सोबत चाकण, शिक्रापूर, रांजणगाव, भोसरी औद्योगिक भागात जाणारी चारचाकी अवजड वाहतूकही आळंदीमार्गे मोठ्या प्रमाणात होते. मात्र, सध्या आळंदीला येणार्या सर्वच मार्गावर खड्ड्यांमुळे वाहनचालक वाहन कुठून चालवायचे आणि खड्ड्यातून वाहने किती महिने चालवायची असा सवाल विचारत आहे. चऱ्होली बाह्यवळण मार्गावर गेली काही वर्षे खड्डेच खड्डे आहेत. लोणीकंद-मरकळ- आळंदी रस्ता नुकतेच कोट्यवधी रुपये खर्चून तयार केला. मात्र, काही महिन्यांतच या रस्त्यावर खड्डे पडलेले. साईडपट्टया भरलेल्या नाहीत. चाकणहून आळंदीला येणार्या रस्त्यावर हनुमानवाडी येथे खड्डेच खड्डे आहे. आळंदी नगरपरिषद हद्दीत देहूफाटा चौकात खड्डे आहेत. सोळू गावाच्या पिरबाबाजवळही गेली काही खड्ड्यांचा विळखा काही सुटला नाही. नागरिकांनी आता आणखी किती काळ खड्ड्यांचा प्रवास करायचा. निगरगट्ट प्रशासन आणि ठेकेदारांच्या हलगर्जीपणाचा उपद्रव आता सामान्य नागरिकांबरोबरच उद्योजकांनाही झाला आहे. अनेकदा निवेदन देऊनही उद्योजकांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करूनही खड्ड्यातील रस्त्यावरून जावे लागत असल्याची खंत उद्योजकांची आहे. यामुळे निकृष्ट दर्जाचे रस्ते तयार करणार्या अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी मागणी आता केली जात आहे.
मुरुमाऐवजी मातीचा वापर
गेल्या महिन्यापासून खड्ड्यातून प्रवास करून नागरिक उद्योजक त्रासले. मंगळवारी (ता. २) सकाळी सोळू आणि चऱ्होली बाह्यवळण मार्गावर प्रशासनाकडून मुरूमवजा माती टाकण्यात आली. मुरुमाद्वारे खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. मात्र, हे कामचलावू खड्डे बुजविल्याने डांबरीकरण कधी होणार याची प्रतीक्षा वाहनचालकांना आहे.
खर्च नेमका खड्ड्यांसाठी की ठेकेदारांसाठी ?
चऱ्होली पूल ते आळंदी रस्ता यांना जोडणारा १७ मीटर रुंदीचा आणि दोन किलोमीटर लांबीचा बाह्यवळण रस्ता सुधारणेसाठी तब्बल ३९३ लाख रुपयांचे आणि इंद्रायणी नदीवर १२ मीटर रुंदीचा पुलाची सुधारणा करण्यासाठी ७८ लाखांचे असे एकूण ४७० लाखांचे अंदाजपत्रक प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्यामार्फत नुकतेच ५ ऑगस्ट रोजी पाठविण्यात आले आहे. हे पत्र नागरिक आणि उद्योजकांच्या हाती पडल्याने निव्वळ पुलावरील खड्ड्यांसाठी ७८ लाखांचा खर्च दाखविण्यात आल्याने हा खर्च नेमका खड्ड्यांसाठी की ठेकेदारांसाठी अशी चर्चा आळंदी भागात सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.