मतदार यादीवर आळंदीत राडा!
आळंदी, ता. १४ : प्रारूप मतदार यादीमध्ये मतदारांच्या झालेल्या फेरफाराबाबत नगरपरिषद कार्यालयात आलेल्या हरकतींची शहानिशा करण्यासाठी गेलेल्या आळंदी नगर परिषदेचे कर्मचारी तसेच बीएलओ कर्मचाऱ्यांसोबत प्रभाग क्रमांक एकमध्ये स्थानिक मतदार वजा राजकीय प्रतिनिधीने वाद घातला. वादाचे पर्यावरण एकमेकांची गचांडी धरण्यापर्यंत गेली.
नुकतेच आळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीकरिता प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. यादीमध्ये अनेक मतदारांची नावे एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात परस्पर वळविण्यात आलेली होती. त्यामुळे मतदारांचा या प्रारूप मतदार यादीवर आक्षेप होता. मागील चार-पाच दिवसांमध्ये मतदार यादीवर हरकत मतदारांनी अर्जाद्वारे नगर परिषदेमध्ये केली होती. मंगळवारी (ता. १४) आळंदी नगर परिषदेच्या वतीने नगर परिषदेचे कर्मचारी आणि बीएलओ कर्मचारी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यासाठी प्रभाग क्रमांक एकमध्ये गेले होते. यावेळी तेथील एका मतदार वजा राजकीय प्रतिनिधी सोबत स्थळ पाहणी करत असताना या कर्मचाऱ्यांचा वाद झाला. मतदाराची ओळख पटवण्यासाठी नगर परिषद कर्मचारी गेले असता मतदार इथे राहत नाही तो केळगावचा आहे त्यावरून वाद सुरू झाला. प्रभाग एकमधील मतदार वजा राजकीय प्रतिनिधी आणि नगर परिषद कर्मचारी बीएलओ यांच्यामध्ये यावेळी वादावादी होऊन त्याचे पर्यावरण एकमेकांची गचांडी धरण्यापर्यंत गेली. काही काळ वाद सुरू राहिल्यानंतर दोघांनीही भांडण आटोपते घेतले आणि वादावर पडदा पडला.
आणखी वादावादीची भीती
शहरात या वादावादीची चर्चा झाली. खरे तर प्रारूप मतदार यादीमध्ये मतदारांचा नावांचा तसेच एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात मतदाराचे नाव बदलले गेल्याने मतदारांच्या मनात चीड आहे. काही राजकीय प्रतिनिधी या प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करून नगर परिषद कर्मचाऱ्यांवर दबावही टाकत आहेत. अनेक जण मतदारांची हरकत अर्ज स्वतःहून गठ्ठ्याने घेऊन नगर परिषदेमध्ये दाखल करत होते. यामुळे स्थळ पाहणीच्या वेळी आणखी वादावादी होण्याची शक्यता अधिक आहे.
मुख्याधिकाऱ्यांनी काढले जाहीर आवाहनाचे पत्र
नागरिकांनी सहकार्य करावे. तसेच आळंदी शहरातील राजकीय प्रतिनिधींना नम्र विनंती करण्यात येणार आहे चौकशी कामात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करू नये. पथकासमवेत फिरू नये ही कार्यवाही निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार तसेच शासन निर्णय केली जात आहे. नागरिक तसेच राजकीय प्रतिनिधींनी चौकशीस आलेल्या पथकास सहकार्य करावे ही सर्वांची जबाबदारी आहे, असे जाहीर आवाहन पत्र नगर परिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी काढले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.