पुणे
ज्ञानेश्वर विद्यालयात सुरक्षिततेचे धडे
आळंदी, ता. ३० : येथील ज्ञानेश्वर विद्यालयातील आठवी व नववीच्या विद्यार्थिनींना सुरक्षितता आणि कायदे या विषयावरील मार्गदर्शन सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेखा देशमुख यांनी केले. येथे नुकतेच विविध विषयावर स्टुडंट पोलिस कॅडेट उपक्रमाअंतर्गत पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या वतीने कार्यशाळा घेण्यात आली.
संपूर्ण वर्षभर विविध शाळांमधील मुलींसाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. याप्रसंगी प्राचार्य सूर्यकांत मुंगसे, पर्यवेक्षिका अनिता पडळकर, ज्येष्ठ शिक्षिका हेमांगी उपरे, राजश्री भुजबळ, सायुज्जता तायडे, स्वागती कदम, लीना नेमाडे, अनघा देशमुख, गणेश लिखे आदी उपस्थित होते.

