आळंदी बाह्यवळण मार्गावर कचऱ्याचे ढीग

आळंदी बाह्यवळण मार्गावर कचऱ्याचे ढीग

Published on

आळंदी, ता. ३ : आळंदी नगर परिषद आणि केळगाव ग्रामपंचायत हद्दीत लागून असलेल्या बाह्यवळण मार्ग सध्या वाहनांच्या वरदळीऐवजी कचरा फेकण्यासाठीच वापरला जात असल्याचे चित्र दिसत आहे. येथे वाहनांची वर्दळ कमी आणि जागोजागी कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे येथील रुग्णालयाच्या रुग्णांनाही उपद्रव होत आहे.
राज्यतीर्थ विकास आराखड्यातून आळंदी नगरपरिषद लागून बाह्यवळण रस्ता तयार करण्यात आला. मात्र, याठिकाणी परिसरातील बेशिस्त नागरिक कचरा टाकत आहे. येथून ये- जा करणाऱ्या नागरिकांना, शाळेत सोडण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थी पालकांना या दुर्गंधीचा उपद्रव होत आहे. बाह्यवळण मार्गाला लागूनच ओढा आहे. ओढ्यामध्ये काही लोक कचरा टाकत आहेत. ओढ्यामध्ये नैसर्गिक पाण्याचा स्रोत असूनही या ठिकाणी इमारतीचे रॅबिट ट्रॅक्टरने आणून टाकले जात आहे. प्लॅस्टिक, तसेच घरातील जुने कपडे या रस्त्यावर फेकून दिले जातात. जुने फर्निचर, तसेच माती, विटांचे तुकडे बिंदकपणे रस्त्यावरच पडलेले दिसून येतात. अर्ध्याहून अधिक रस्ता हा कचऱ्यानेच व्यापलेला आहे.
जवळच कॅन्सर रुग्णांवर उपचार करणारे मोठे हॉस्पिटल आहे. या ठिकाणी राज्यभरातून कॅन्सर रुग्ण तपासणीसाठी, तसेच उपचार घेण्यासाठी येतात. या रुग्णांनाही कचऱ्याच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, यावर प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची उपाययोजना राबवली जात नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

ओढ्यामध्येही कचरा आणि सांडपाणी
गावोगावी नैसर्गिक पाण्याचा स्रोत असलेल्या ओढ्यांचे खोलीकरण करून जतन केले जाते. इथे मात्र ओढ्यामध्ये सांडपाणी सोडले जाते व कचरा फेकला जातो. आजही ओढ्याला पाणी वाहत आहे. सगळ्यात मोठा ओढा या ठिकाणी असून, तो इंद्रायणीला मिळतो. मात्र, याची साफसफाई, तसेच जपणूक होताना दिसत नाही.

06569

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com