आळंदी ग्रामीण रुग्णालयात मनुष्यबळाचा अभाव

आळंदी ग्रामीण रुग्णालयात मनुष्यबळाचा अभाव

Published on

आळंदी, ता. ३ : येथील ग्रामीण रुग्णालयात सध्या रुग्णालयात कक्षसेवक (शिपाई) दोन असून दोन पदे रिक्त आहेत. साहाय्यक अधीक्षक आणि कनिष्ठ लिपिक एक पदे रिक्त आहेत. एका कनिष्ठ लिपिकावर कार्यालयीन कामकाज सुरू आहे. आणि लेखणीचे कामे तर प्रचंड असतात. अन्य ठिकाणी दर हजारी एक आशा वर्कर असते; पण आळंदीला एकही नाही. पोलिओ, क्षयरोग, कुष्ठरोग लसीकरण आणि इतर कामांचे सर्व्हेक्षण तिच्यामार्फत केले जाते; पण तुटपुंज्या मनुष्यबळावर ही कामे होतात.
आळंदी (ता. खेड) येथे १५ वर्षांपूर्वी ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम झाले आहे. विविध प्रकारच्या सुविधा या ठिकाणी दिल्या जात असून सकाळी ओपीडी सुरू केल्यापासून रुग्णांची तपासणी तसेच उपचारासाठी रांग लागलेली असते. खास करून ताप, थंडी, खोकला, सर्दी तसेच चर्म रोग याबाबत तपासणीसाठी येतात. अंतर रुग्ण भरती (अॅडमिट) करून घेण्यासाठी स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी वेगवेगळे कक्ष असल्याने येथे अंतर रुग्ण संख्या वाढली आहे. बरोबर स्वतः वैद्यकीय अधिकारी आणि त्यांचे सहकारी प्रसूतीची ग्रामीण रुग्णालयात उपचार करत असल्याने ३० ते २५ नियमित तपासण्या होत असेल १५ ते २० प्रसूतीच्या केसेस दररोज होत आहेत. स्वतंत्रपणे रक्त तपासणी भूल देणे सोनोग्राफी आणि एक्स-रेची सुविधा या रुग्णालयात आहे. यामुळे खासगी रुग्णालयाप्रमाणेच उपचार घेण्यासाठी गर्दी असते. सरासरी महिन्याला ११०० ते १२०० एक्सरे तपासणी केली जाते.


आळंदी तीर्थक्षेत्र असल्याने आणि वारकरी विद्यार्थी शिक्षणासाठी वाढल्याने ओपीडीची संख्या वाढली आहे. रोजंदारीवरील महिलांची सोय ग्रामीण रुग्णालयात होत असल्याने सिझर ऑपरेशनसह प्रसूतीच्या केसेस वाढत आहे.
- डॉ. ऊर्मिला शिंदे, वैद्यकीय अधिकारी

खास वाऱ्यांसाठी आयसीयू सुरू
आषाढी कार्तिकी कामकाजात बरेच चांगले बदल केले आहेत. या दोन वाऱ्यांसाठी रुग्णालयामध्ये आता आयसीयू सुरू केले. मागच्या कार्तिकीत १ लाख ३५००० बाह्य रुग्ण तपासणी झाली, आंतररुग्ण तपासणी ९९१ झाले. २५० ते ३०० रुग्णांची ईसीजी तपासणी दर महिन्याला केली जाते. महिन्याला नऊ ते दहा हजार जणांची रक्त, लघवी तपासणी केली जाते.

06575

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com