पुणे
आळंदीत वीज चोरीबाबत कारवाई
आळंदी, ता. २३ : बारा महिन्यांपासून १४७३ युनिटची वीज चोरी केल्याबद्दल मरकळमधील राजेंद्र नामदेव यांच्यावर आळंदी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे ग्रामीण पावर हाउस रास्ता पेठ यांच्या भरारी पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. जयंत धनराज गेटमे यांनी आळंदी पोलिस ठाण्यामध्ये या वीज चोरीबाबत गुरुवारी (ता. २०) फिर्याद दिली. आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र नामदेव यांच्या मरकळ येथील गट नंबर २१५ ऑब्लिक एक या जागेमध्ये विनामीटर वीज वापर करण्यात आला. साधारण २६४०० चे महावितरण कंपनीचे आर्थिक नुकसान या वीजचोरीमुळे झाले. भरारी पथकाने केलेल्या तपासणीच्या वेळी अधिकचा जोड फार आढळून आला. यामुळे वीज चोरीप्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे.

