आळंदीकरांना आता दीड कीमीची पायपीट
आळंदी, ता. २८ : येथील देहू फाटा चौकातील एसटी महामंडळाच्या चार एकर जागेत पीएमपीएमएल बसेस उभ्या करण्यास शुक्रवार (ता. २८) पासून सुरुवात झाली. यामुळे आळंदीकरांना आता दीड किलोमीटरची पायपीट बससाठी करावी लागणार आहे.
आळंदी शहरामध्ये पीएमपीएमएलला स्वतःचे आगार नाही. नगरपालिका चौकातील नगरपरिषदेच्या जागेने भाडेपट्ट्याने पीएमपीएमएल आगार चालत होते. मागील काही वर्षांमध्ये पीएमपीएमएलच्या बसेसची संख्या वाढल्यामुळे आगार कमी पडत होते, याशिवाय प्रवाशांना सुविधा देण्यासाठी जागा योग्य नसल्याने प्रवाशांची ही गैरसोय होत होती. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाच्या चार एकर जागेमध्ये बस थांबायची सोय करण्यात आलेली आहे. शुक्रवारपासून अनेक बसेस या जागेतून रवाना होत होता. जवळपास ८० बस थांबू शकतात एवढी पुरेशी जागा या एसटी महामंडळाच्या जागेत आहे.
संचालित मार्ग
स्वारगेट, मनपा भवन, एनडीए गेट नं. १०, कोथरूड डेपो, मरकळ, भेकराईनगर, शेवाळेवाडी, खराडी, पुणे स्टेशन, भेकराईनगर.
जुन्या बसस्थानकातून सुरू राहणारे मार्ग
सांगवी-आळंदी, भोसरी-पाबळगाव, आळंदी-देहूगाव क्रीडा संकुल, आळंदी-सनी वर्ल्ड सुसगाव, आळंदी-जांबे, भोसरी-आळंदी, आळंदी-चाकण आंबेठाण चौक, डी. वाय. पाटील कॉलेज-आळंदी, चऱ्होलीगाव-आळंदी, पिंपरीगाव-आळंदी, हिंजवडी माण फेज-३ -आळंदी, देहूगाव-तळेगाव दाभाडे, व्हायसीएम हॉस्पिटल-आळंदी, महाळुंगेगाव-आळंदी, औंधगाव-आळंदी, बाणेर डेपो-आळंदी, निगडी-आळंदी.
एसटीच्या बसेस कोठे उभे राहणार?
एसटी महामंडळाच्या मुख्यालयाने पीएमपीएमएलसाठी चार एकर जागा दिली. राज्य तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून जवळपास अडीच एकर होऊन अधिक जागा वाहनतळासाठी आणि सुलभ शौचालयासाठी खर्ची झालेली आहे. यामुळे आता एसटी महामंडळाच्या बसेस कोठे उभे राहणार हा प्रश्न निर्माण होणार आहे. नाहीतर एसटी महामंडळाला राज्यभरात एसटी सुरू करण्यासाठी सर्वात चांगली आणि किफायतशीर जागा होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

