आळंदीत रंगणार नेत्यांच्या सभा
आळंदी, ता. २९ : आळंदी नगर परिषद निवडणूक अनुषंगाने प्रचाराचा धुराळा उडाला असून, सर्वच उमेदवारांनी पदयात्रा काढल्या. आता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याही सभा रंगणार आहे. भाजप उमेदवारांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची सोमवारी (ता. १) सायंकाळी चार ते सहा या वेळेत सभा आयोजित केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ११ ते ३ वाजेपर्यंत कोपरासभा आणि बाईक रॅली काढण्यात येणार आहे.
आळंदी नगरपरिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदासाठी भाजपचे प्रशांत कुऱ्हाडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश कुऱ्हाडे यांच्यामध्ये लढत होत आहे. नगरसेवकपदासाठी ६१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामध्ये भाजपचे २१, शिवसेनेचे १०, राष्ट्रवादी काँग्रेसचे १५, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चार, काँग्रेसचा एक आणि दहा अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

