आळंदीत अनोळखीचा घाटावर पडल्याने मृत्यू
आळंदी, ता. २९ : येथे इंद्रायणी तीरावर ५२ वर्षीय अनोळखी व्यक्तीचा दगडी घाटावर तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाला. आळंदी पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी (ता. २७) इंद्रायणी घाटावर घडली.
आळंदी पोलीस पेट्रोलिंग करत असताना पहाटे सहाच्या सुमारास अंदाजे ५२ वर्षे वयाचा अनोळखी व्यक्ती घाटावर बसून होता. त्याच्या डोक्याला पाठीमागून मार लागल्याने अंगावर रक्ताचे डाग होते. दारू पिल्यामुळे त्याचा तोल जात होता. यावेळी घाटावर बसलेल्या अन्य एका व्यक्तीने त्याच्याबद्दल सांगताना पोलिसांना माहिती दिली की, तो रोज घाटावर पडलेला असतो आणि रोज दारू पीत असतो. जखमी अवस्थेतील या व्यक्तीला पोलिसांनी रुग्णवाहिका बोलवून पुढील उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात पाठवले. तेथे तो मयत झाल्याचे सांगण्यात आले. आकस्मिक मयत अशी आळंदी पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आले आहे. या मृत्यूबाबत माहिती यू. बी. जाधव यांनी आळंदी पोलीस ठाण्यात दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

