कचरा डेपोच्या आगीमुळे
आळंदीत धुराचे लोट

कचरा डेपोच्या आगीमुळे आळंदीत धुराचे लोट

Published on

आळंदी, ता. २९ : आळंदी नगरपरिषदेच्या कचरा डेपोला कार्तिकी यात्रेपूर्वी लागलेली आग आटोक्यात आली आहे. मात्र, त्यातून निघणारा धूर अद्याप थांबला नाही. धुरामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे.
आळंदी देवस्थानने नगरपरिषदेला पाच एकर जागा कचरा डेपोसाठी दिली होती. मात्र, शहरातील जमा केलेला कचरा या ठिकाणी आणून टाकल्यानंतर त्याचे व्यवस्थापन, तसेच त्याची निगा राखली न गेल्याने तिथे कार्तिकी वारीपूर्वी आग लागली होती. या आगीच्या घटनेत संपूर्ण कचरा जळून खाक झाला आहे. तात्पुरती उपाययोजना केल्यानंतर नगरपरिषदेचे दुर्लक्ष झाले. आजूबाजूच्या केळगाव आणि चऱ्होली ग्रामपंचायतीच्या नागरिकांना या धुराच्या प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत मनसेचे आळंदी शहर अध्यक्ष अजय तापकीर यांनी सांगितले की, ‘‘आळंदी नगरपरिषद प्रशासनाने तत्काळ याकडे लक्ष द्यावे. दररोज धुराचे प्रदूषणामुळे नागरिकांना होणारा त्रास बंद करावा, अन्यथा मनसे स्टाईल पाठपुरावा केला जाईल.’’

06819

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com