आळंदीत निवडणूक सभांमुळे आज वाहतूक बदल
आळंदी, ता. ३० : आळंदी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सोमवारी (ता. १) शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पूर्वनियोजित सभेमुळे गर्दी अपेक्षित आहे. त्यामुळे वाहनांची कोंडी होण्याची शक्यता पाहता शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आळंदी पोलिस वाहतूक विभागाने पर्यायी मार्ग आणि वाहतूक निर्बंधांची अधिसूचना सादर केली आहे. देहूफाटा चौक ते आळंदी या दरम्यान सभेसाठी जाणाऱ्या वाहनांना वगळून अन्य सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी असणार आहे.
पिंपरी चिंचवड वाहतूक शाखा विभागातील पोलिस आयुक्त विवेक पाटील यांनी काढलेल्या अधिसूचनेनुसार राजकीय सभांच्या अनुषंगाने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याची सूचना वाहन चालकांना करण्यात आली आहे. वडमुख वाडी, चऱ्होली फाटा, आळंदीतील देहू फाटा या भागात पोलिसांच्या सूचनेनुसार वाहतूक व्यवस्था वळविण्यात येणार आहे.
सोमवारी लग्नाचा मुहूर्त असल्याने आळंदीमध्ये अनेक ठिकाणी मंगल कार्यालयांमध्ये लग्नविधी होणार आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड तसेच अन्य भागातून येणाऱ्या वऱ्हाडींची वाहतूक व्यवस्थेतील बदलामुळे गैरसोय होणार आहे.
प्रवेशबंदी
- मरकळ ते मोशी मार्गावरून येणाऱ्या वाहनांना पीसीएमसी चौकामार्गे वडगाव-घेनंद-चाकण-पुण्याकडे जाण्यास मनाई.
- वडगाव-घेनंद बाजूकडून येणाऱ्या वाहनांना आळंदीमार्गे पुणे आणि चाकण दिशेला जाण्यास मनाई.
- देहूफाटा चौक ते आळंदी दरम्यान सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी असणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

