आळंदीत ३० मतदान केंद्रांची व्यवस्था

आळंदीत ३० मतदान केंद्रांची व्यवस्था

Published on

आळंदी, ता. ३० : आळंदी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपद आणि १० प्रभागातील २१ नगरसेवकांच्या जागांसाठी होत असलेल्या निवडणूकीसाठी आळंदी नगरपरिषद प्रशासन सज्ज झाले आहे. शहराच्या विविध भागात ३० मतदान केंद्रांची व्यवस्था केली आहे. मुख्य गावठाणतील खेड तालुका हद्दीत २० आणि नदी पलीकडे १० मतदान केंद्रे आहेत.
नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून प्रशांत कुऱ्हाडे तर राष्ट्रवादीकडून प्रकाश कुऱ्हाडे आणि दोन अपक्ष असे चौरंगी लढत होत आहे. तर नगरसेवकपदाच्या २१ जागांसाठी एक ते नऊ प्रभागातून प्रत्येकी दोन आणि दहाव्या प्रभागांमध्ये तीन नगरसेवक निवडले जाणार आहेत. काही ठिकाणी भाजप राष्ट्रवादी काही प्रभागात भाजप शिवसेना अशी लढत होत आहे. वास्तविक राज्य सरकारमध्ये हे तीनही पक्ष महायुतीमध्ये गणले जातात. मात्र आळंदी नगर परिषद मध्ये एकमेकांविरोधात ठाकले आहेत.


एकूण मतदार - २५३३१
स्त्री मतदार ११८२७
पुरुष मतदार १३५०१
अन्य ०३

एकूण मतदान केंद्र संख्या ३०
हवेली आणि खेड
हवेली १०, खेड २०
निवडणूक अनुषंगाने कर्मचारी टीम संख्या. एकूण टीम ३०, राखीव टीम ५
एका टीम मधे. ०६ लोक.

इव्हीएम .......संख्या
कंट्रोल युनिट.......३०
बॅलेट युनिट.......३५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com