आळंदीत उभारणार १०० बेडचे ट्रामा सेंटर

आळंदीत उभारणार १०० बेडचे ट्रामा सेंटर
Published on

आळंदी, ता. १ : नगरपरिषदेच्या माध्यमातून आळंदी शहराच्या विकासाची स्वप्न पूर्ती करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मानणाऱ्या भाजपाच्या उमेदवारांना निवडून द्या. निडणुकीनंतर एक कोटी लाडक्या बहिणीला लखपती होतील. आळंदीसाठी ७०१ कोटींचा संतपीठ आणि १०० बेडचे उपजिल्हा रुग्णालय आणि १०० बेडचे ट्रामा केअर सेंटर आळंदीला केले जाणार आहे. प्रत्येक घरात पिण्याच्या पाण्याची सोय करायची असल्याने सुधारित पाणीपुरवठा योजना ३२२ कोटींची तयार केली आहे. निवडणूक झाल्यानंतर हा आराखडा मंजूर करू आणि आळंदी शहराला पाणी देण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस आळंदीत आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राज्याचे तंत्र व उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार उमा खापरे, राजेश पांडे, आचार्य तुषार भोसले, प्रदीप कंद, राम गावडे, प्रशांत कुऱ्हाडे आणि सर्व उमेदवार उपस्थित होते. फडणवीस म्हणाले की, ‘‘भाजपने मागील १० वर्षांत राज्यभरामध्ये शहर विकासासाठी ५० हजार कोटींचा निधी दिला. गावांबरोबरच शहरांचाही विकास झाला पाहिजे ही भूमिका भाजपची आहे. आळंदी नगरपरिषदेत मागील पंचवार्षिकला भाजप सत्तेत आल्यावर दहा एमएलडी पाणी पिण्यासाठी दिले. प्रत्येक घरात पिण्याच्या पाण्याची सोय करायची असल्याने सुधारित पाणीपुरवठा योजना ३२२ कोटींची तयार केली आहे.
इंद्रायणी नदी सातत्याने फेसाळत आहे नदीचे महत्त्व वारकऱ्यांसाठी खूप मोठे आहे. इंद्रायणी नदी प्रदूषण हटवण्यासाठी आराखडा तयार केला असून नगरपरिषद ग्रामपंचायत पातळीवर एसटीपी प्रकल्प राबवले जाणार आहेत. काही दिवसांत इंद्रायणी निश्चित सुंदर दिसेल. १६०० कोटी निधीतून रस्ते विजेचे काम तसेच २०० कोटी रुपयांच्या शहर विकास आराखडा तयार आहे. वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी बाह्यवळण मार्गाला ५८ कोटीचा प्रस्ताव मंजूर केला आहे. पुणे-आळंदी रस्ता ही रुंद करून आहोत. एस टी महामंडळाच्या पाच एकर जागा स्वतंत्र असून त्यामध्ये बहुमजली पार्किंग व्यवस्था फक्त निवास साठी ३५ कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे. सातवीपर्यंत वर्ग असलेल्या नगरपरिषद शाळांमध्ये यापुढे दहावीपर्यंत वर्गांची वाढ केली जाईल. स्वच्छ दिसण्यासाठी आवश्यक तो सर्व निधी वेळोवेळी पुरवल्या जाईल.


आज एकादशी आणि गीता जयंतीचा दिवस असल्याने माऊलींच्या दर्शनाची ओढ होती. यामुळे आळंदीला आजच्या दिवशीच्या प्रचाराला महत्त्व आहे. पहिली सभा ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरी लिहिलेल्या नेवासा येथे तर आज शेवटच्या दिवशीची सभा ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिरातील आळंदीमध्ये घेतल्याचा उल्लेख आवर्जून मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.

ALD25B06829

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com