आळंदीत शांततेत मतदान

आळंदीत शांततेत मतदान

Published on

आळंदी, ता. २: नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी (२१ सदस्य) मंगळवारी (ता. २) दहा प्रभागांमध्‍ये ७५ टक्‍के मतदान झाले. दरम्यान, मतमोजणी २१ डिसेंबर पर्यंत लांबल्याने अनेक उमेदवारांमध्‍ये धाकधूक सुरू झाली असून खुल्या गटातील नगराध्यक्ष असल्याने नगर परिषदेवर सत्ता भाजप की राष्ट्रवादी याबाबत उत्सुकता आहे.
आळंदी नगराध्यक्ष पद हे खुल्या प्रवर्गासाठी असून चार जणांनी निवडणूक लढवली. तर दहा प्रभागांतून निवडले जाणाऱ्या २१ सदस्य पदासाठी ६१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यापैकी प्रभाग आठमध्ये सुजाता तापकीर या बिनविरोध उमेदवार होत्या. अन्य प्रभागातील निवडणुकांसाठी भाजपचे २१, शिवसेनेचे १० राष्ट्रवादी काँग्रेसचे १५, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चार, काँग्रेसचे एक आणि दहा अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. राष्ट्रवादी काँग्रेसने प्रभाग एक आणि सातमध्ये एकही उमेदवार दिला नाही तर प्रभाग आठ आणि दोनमध्ये प्रत्येकी एक उमेदवार दिला. यामुळे काही ठिकाणी भाजपची राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर तर काही ठिकाणी शिवसेनेबरोबर संघर्ष होता.
आळंदी शहरांमध्ये एकूण ३० (हवेली हद्दीत १० आणि खेड हद्दीत २०) मतदान केंद्र होते. आज सकाळी झालेल्या मतदाची टक्केवारी कमी होती तर दुपारनंतर मताची टक्केवारी वाढली. महिला तसेच कामगार वर्गातील मतदार मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रावर येऊ लागले. प्रभाग पाचमध्ये पहिल्या चारही टप्प्यात सर्वाधिक मतदान झाले होते. यंदाच्या निवडणुकीमध्ये महिलांपेक्षा पुरुषांची मतदान प्रक्रियेमध्ये आघाडी दिसून आली. निवडणूक निर्णय अधिकारी जयराज देशमुख आणि आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर आणि त्यांचे अन्य सहकारी यांच्या वतीने सर्व मतदान केंद्रांवर ती मंडप आणि सेल्फी पॉइंटची व्यवस्था केली होती.

मतदारसंख्या
पुरुष : ११८२७
महिला: १३५०१
इतर : ०३
एकूण : २५३३१
झालेले मतदान
पुरुष :
महिला :
इतर :
एकूण :

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com