बेशिस्त वाहनचालकांकडून ४ कोटींची वसुली
आळंदी, ता. ९ : वाहन परवाना नसणे, बेशिस्त पार्किंग, नो एन्ट्री, विना हेल्मेट गाडी चालविणे अशा विविध प्रकारच्या बेशिस्त वाहन चालकांना वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल आळंदी- दिघी शहर वाहतूक पोलिसांनी कारवाई करत जानेवारी ते नोव्हेंबर अखेर जवळपास चार कोटी १९ लाख ६१ हजार ३५० रुपयांची दंड आकारणी कारवाई ई चलनाद्वारे केली आहे. यापैकी दंड रक्कम वसुली ५७.२५ टक्के म्हणजेच दोन कोटी ४० लाख २५ हजार २५० रुपयांची वसुली केवळ आळंदी दिघी भागातून झाली आहे.
आळंदी शहर पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कार्यालयात जोडल्यापासून पोलिस खात्याच्या आर्थिक महसूल गोळा करण्यात वाढ झाली आहे. मात्र, वाहतूक कोंडीत सुधारणा झाली नाही. आळंदीसाठी पोलिस संख्या वाढविण्यात आली. प्रत्येक चौकात वाहतूक पोलिस आहेत. बेशिस्त वाहन चालकावर खटले दाखल करत आहेत. काही ठिकाणी ई- चलन फाडले जात आहे. ई- चलनात कमालीची वाढ झाली आहे. यामुळे आळंदीत येताना भाविक, तसेच वऱ्हाडी मंडळींना आता सतर्क राहावे लागणार आहे.
वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईत जानेवारी महिन्यात ५६७२ जणांवर केलेल्या कारवाईत ५० लाख ६९ हजार ४०० रुपये दंडात्मक कारवाई केली. फेब्रुवारीमध्ये ५६२६ जणांवर केलेल्या कारवाईत ५१ लाख ३५ हजार ८०० रुपये, तर नोव्हेंबरमध्ये ३५६९ जणांवर केलेल्या कारवाईत ३१ लाख ६८ हजार ३०० रुपये दंडात्मक कारवाई केली. याचबरोबर ई- चलन दंड न भरल्यास खटलेही दाखल केले आहेत.
कारवाईत वाढ
तसेच वाहतूक पोलिसांनी वर्ष २०२३मध्ये ४४ हजार ५८४, तर वर्ष २०२४ मध्ये ४२ हजार ६८० वाहन चालकावर कारवाई केली. या वर्षी २०२५ मध्ये हीच कारवाई ५०००० पर्यंत गेली आहे. यामुळे आळंदीला येताना वारकरी, लग्नातील वऱ्हाडी यांनी रस्त्यावर, तसेच मंदिर परिसरात गाडी उभी न करता योग्य वाहनतळाच्या जागा लावावी, अन्यथा ई- चलन कारवाई, तसेच टोईंगच्या कारवाईला सामोरे जावे लागेल.
कोंडीकडे लक्ष देणे गरजेचे
आळंदीकरांच्या मागणीनुसार वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी वाहतूक पोलिस वाढवून मिळाले. मात्र, ई- चलनच न पाहता शहरातील वाहतूक कोंडीकडेही पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच, वाहतूक कोंडी मुक्त शहर संकल्पना राबवणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

