आळंदी शहरात वाहतूक कोंडी
आळंदी, ता. ७ : पदपथावरील अतिक्रमण, रस्त्यावर उभ्या अस्ताव्यस्त गाड्या आणि बेशिस्त वाहन चालकाकडून दंडाच्या पावत्या फाडण्यात व्यस्त वाहतूक पोलिस, यामुळे आळंदी (ता. खेड) शहरात बुधवारी (ता. ७) वाहतूक कोंडीचा प्रत्यय आला.
आळंदी- चऱ्होली बाह्यवळण मार्गांवरील पूल आणि रस्ता दुरुस्तीमुळे शहरातून मोठ्या प्रमाणात वाहने ये- जा करत आहेत. त्यातच आळंदी- लोणीकंद मार्गही दुरवस्थेत आहे. त्यामुळे शहरातून वाहनांची वर्दळ वाढली आहे. सायंकाळी कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात ये- जा करत आहेत. आळंदीतील रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने उभी असतात, तर वाहनचालक नियम मोडून वाहने मध्येच घालून दोन्ही बाजूचे रस्ते जाम करत असल्याचे चित्र आहे. विरुद्ध बाजूने येणाऱ्या वाहनांची संख्या अधिक आहे. यामुळे गावठाणातील रस्त्याबरोबरच अन्य रस्त्यावरही वाहतूक कोंडी जाणवत आहे. देहू फाट्यावर किराणा मालाच्या दुकानासमोर रस्त्यावर अवजड वाहने आडवी लावली जातात. यामुळे मोठी वाहतूक कोंडी होत आहे.
परिणामी विद्यार्थी आणि कामगार वर्गाचा अधिकचा वेळ वाहतूक कोंडीमध्ये खर्ची होत आहे. छोट्या छोट्या रस्त्यावर गल्ली बोळातही गाड्या वेगाने आणि विरुद्ध बाजूने चालवल्या जात आहेत. चाकण चौक ते देहू फाटा, भैरवनाथ चौक, मरकळ रस्ता पालिका चौक देहूफाटा भागात वारंवार रस्ते वाहतूक कोंडीने ग्रस्त आहेत. वाहतुकीचे नियोजन प्रभावी नसल्याने आणि आळंदी- चऱ्होली बाह्यवळण रस्ता दुरुस्ती काम संथ गतीने चालण्याने मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे.
प्रशासनाचा काणाडोळा
रस्त्यावरील अतिक्रमण नगर परिषदेकडून काढले जात नाही. त्यात पदपथावर आणि रस्त्यावर हातगाड्या असूनही कारवाई केली जात नाही. नागरिकांना वाढत्या वाहतुकीमुळे चालण्यासाठी रस्ताही मिळत नाही. ज्येष्ठ आणि विद्यार्थी जीव मुठीत धरून रस्त्यावर चालतात. मात्र, ढिम्म असलेले पोलिस आणि नगर परिषद प्रशासन मात्र काणाडोळा करत असल्याचे चित्र आहे.
06981
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

