‘इंद्रायणी’ प्रदूषणाची नगराध्यक्षांकडून दखल

‘इंद्रायणी’ प्रदूषणाची नगराध्यक्षांकडून दखल

Published on

आळंदी, ता. २१ : आळंदी (ता. खेड) येथील इंद्रायणी नदीचे पात्र सांडपाणी व रसायनयुक्त पाण्यामुळे दिवसेंदिवस प्रदूषित होत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याची दखल घेत नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ (मोशी), पीएमआरडीए आयुक्त, वाकडेवाडी येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक अधिकारी यांना पत्रव्यवहार केला आहे.
आळंदीत हजारो भाविक दर्शनासाठी आणि पवित्र तीर्थ स्थानासाठी येतात. मात्र, येथे आल्यावर येथील नदीपात्रातील दूषित पाण्यामुळे भाविकांना त्वचारोग आणि इतर गंभीर आजार होण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतून येणारे सांडपाणी, तसेच उद्योजकांकडून सोडल्या जाणाऱ्या रासायनिक सांडपाण्यामुळे इंद्रायणी नदीमध्ये फेस निर्माण होत आहे. इंद्रायणी नदी प्रदूषणाला जबाबदार असणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगर पालिका हद्दीतील सांडपाण्यावर प्रक्रिया न करणाऱ्या गृहप्रकल्प आणि उद्योजकांची तपासणी करून त्यावर उपयोजना करावी. तसेच, एसटीपी प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू आहे की नाही यावर कठोर उपाययोजना कराव्यात, असे पत्रात नमूद केले आहे.

नगराध्यक्ष कुऱ्हाडे यांनी सांगितले की, ‘येथील पाणीपुरवठा विभागाच्या सिद्धगड बंधाऱ्याखाली मोठ्या प्रमाणात इंद्रायणी नदीवर फेस येत आहे. परिणामी मृत मासे आढळून आले आहेत. ही घटना नदीच्या अत्यंत प्रदूषित होत असलेल्या पाण्याची आणि परिसंस्थेच्या ऱ्हासाची द्योतक आहे. नदीकाठच्या गावातून प्रक्रिया न केलेले महिला मिश्रित सांडपाणी आणि औद्योगिक वसाहती मधील घातक रासायनिक पाणी थेट नदीपात्रात सोडले जात आहे. यामुळे पाण्याचे ऑक्सिजन प्रमाण कमी होऊन जलचर मृत्युमुखी पडत आहेत. यामुळे नदीपात्रात सांडपाणी सोडणाऱ्या ग्रह प्रकल्पांवर आणि प्रक्रिया न करता सांडपाणी सोडणाऱ्या उद्योजकांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. पूर्ण क्षमतेने सुरू आहेत की नाही याबाबत एसटीपी प्रकल्पांची ही तपासणी करून नवीन प्रकल्प तातडीने कार्यान्वित करावेत. तसेच नदीपात्रातील पाण्याचे नमुने घेऊन प्रदूषणाचे मुख्य स्रोत शोधून त्यावर कायमस्वरूपी बंदी आणण्याची कार्यवाही करावी.’’

‘सकाळ’च्या वृत्ताची दखल
‘सकाळ’कडून मंगळवारी (ता. २०) आणि बुधवारी (ता. २१) इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाबाबत आलेल्या वृत्ताची दखल घेऊन नगराध्यक्ष कुऱ्हाडे यांनी तातडीने इंद्रायणी नदी सुधारणेबाबत संबंधित प्रशासकीय व्यवस्थेसोबत पत्र व्यवहार केला. कुऱ्हाडे यांनी या इंद्रायणी नदी प्रदूषणाबाबत भोसरी विधानसभा आमदार महेश लांडगे यांच्या सोबतही नदी प्रदूषणाचा विषय मार्गी लावण्याबाबत चर्चा करणार असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com