आळंदीत विषय समित्यांवर महिलाराज
आळंदी, ता. २३ : आळंदी (ता. खेड) नगरपरिषदेच्या विविध विषय समित्या आणि स्थायी समितीची स्थापना नगर परिषदेमध्ये झालेल्या विशेष सभेत बिनविरोध करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी दिली. स्थायी समिती सभापती वगळता अन्य विषय समितीच्या सभापतिपदी महिला नगरसेवकांची वर्णी लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. शिवसेनेच्या वतीने निवडून गेलेले आदित्य घुंडरे यांची विरोधी पक्ष नेते म्हणून निवड झाली आहे.
विविध विषय समित्यांबाबत विशेष सभा शुक्रवारी (ता. २३) पीठासीन अधिकारी तथा मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. आळंदी नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे हे भाजपचे असून, त्यांच्यासोबत १५ नगरसेवक भाजपचे, चार नगरसेवक शिवसेना आणि दोन नगरसेवक राष्ट्रवादी कॉंग्रेस, असे पक्षीय बलाबल आहे. त्यामुळे सर्वच विषय समित्या सभापतिपद भाजपकडे गेले, तर शिवसेनेचे चार नगरसेवक निवडून आल्याने आदित्य घुंडरे यांची विरोधी पक्ष नेते म्हणून निवड झाली आहे.
नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांची स्थायी समितीचे सभापती म्हणून निवड करण्यात आली. येथील नगरपरिषदेत सर्वात महत्त्वाची मानल्या जाणाऱ्या पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतिपदी उपाध्यक्षा सुजाता तापकीर, सार्वजनिक बांधकाम व स्वच्छता समितीच्या सभापतिपदी साक्षी कुऱ्हाडे, तर यात्रा समिती सभापतिपदी पूजा घुंडरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
याचबरोबर अन्य विषय समित्यांमधील शालेय शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समितीच्या सभापतिपदी खुशी बोरुंदिया, मागासवर्गीय कल्याणकारी व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतिपदी वैजयंता उमरगेकर, महिला व बालकल्याण व वैद्यक समितीच्या सभापतिपदी ऋतुजा तापकीर, तर महिला व बालकल्याण व वैद्यक समितीच्या उपसभापतिपदी कांचन येळवंडे यांची निवड करण्यात आली आहे.
सदर विषय समित्या आणि स्थायी समितीचा कालावधी २३ जानेवारीपासून एक वर्षासाठी राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

