आळंदीत शोकाकूल वातावरण
आळंदी : अजित पवार यांचे बारामती येथील अपघाती निधनाची वार्ता करताच आळंदी येथील महाद्वारातील व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली. आळंदी मंदिर परिसर आणि शहरात बहुतांश ठिकाणी व्यापाऱ्यांनी उस्फूर्त दुकाने बंद ठेवली होती. मंदिर आणि शहरात दादांच्या अपघाती निधनामुळे शोकाकूल वातावरण निर्माण झाले होते.
आळंदी आज येथील संत ज्ञानेश्वर माउलींच्या संजीवन समाधी परिसरातील प्रसाद, फूल विक्रेते यांनी दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली होती. याचबरोबर प्रदक्षिणा रस्ता मरकळ रस्ता या भागातही काही व्यापाऱ्यांनी आपले दुकाने बंद ठेवली. आळंदी नगरपरिषद कार्यालयही आज बंद ठेवले होते. आळंदीतील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर दादांच्या निधनाच्या वाढत्याने शोककळा पसरली होती. आणि कार्यकर्ते शोकाकूल झालेले होते. वारकरी संप्रदायामध्ये दादांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत होती.
दरम्यान, महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक विभागाचे संत ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार प्राप्त आणि जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक शांतिब्रह्म मारुती महाराज कुरेकर यांनी श्रद्धांजली व्यक्त करताना म्हटले की, अजित पवार यांच्या दुर्दैवी मृत्यूने महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे. ती भरून न निघणारी आहे. महाराष्ट्राचा एक थोर कार्यकर्ता आपल्याला सोडून गेला. त्यांना सद्गती मिळो. पुन्हा आणखी जन्म घेऊन महाराष्ट्राची सेवा करण्यात यावी अशी प्रार्थना पांडुरंगचरणी करतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

