आळंदीत ‘संडे फॉर इंद्रायणी’ उपक्रम

आळंदीत ‘संडे फॉर इंद्रायणी’ उपक्रम

Published on

आळंदी, ता. २ ः आळंदी (ता. खेड) येथील इंद्रायणी नदीचा परिसर स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, आळंदी नगर शाखेच्या वतीने ‘संडे फॉर इंद्रायणी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत अभाविपच्या कार्यकर्त्यांनी इंद्रायणी घाटावर एकत्र येत स्वच्छता मोहीम राबवली.
इंद्रायणी नदी ही लाखो वारकरी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मात्र, घाटावर मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक आणि कचरा साठत असल्याचे चित्र नेहमीच पाहायला मिळते. ही बाब लक्षात घेऊन अभाविप आळंदी नगराने दर रविवारी स्वच्छता करण्याचा संकल्प केला आहे. आजच्या मोहिमेत कार्यकर्त्यांनी नदीपात्रातील प्लॅस्टिक पिशव्या, बाटल्या, निर्माल्य आणि इतर कचरा गोळा करून घाटाची स्वच्छता केली. विशेष म्हणजे, मागील अनेक आठवड्यांपासून अभाविपचे कार्यकर्ते कोणताही खंड पडू न देता हे अभियान राबवत आहेत. केवळ प्रशासनावर विसंबून न राहता, नदीचे पावित्र्य राखणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, अशी भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. गोळा केलेला कचरा योग्य विल्हेवाटीसाठी नगरपरिषद प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आला. या स्वच्छता मोहिमेत अभाविप कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अभाविपच्या या सातत्यपूर्ण कार्याचे आळंदीतील नागरिकांकडून आणि वारकरी भाविकांकडून विशेष कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com