आळंदी नदीपुलावरील रस्ता डांबरीकरणाने चकाचक
आळंदी, ता. १० : आळंदी नगरपरिषद हद्दीतील देहूफाटा ते चाकण चौक यांना जोडणाऱ्या गरुड स्तंभालगतच्या इंद्रायणी नदीपुलावरील रस्त्याची दुरुस्ती आणि डांबरीकरणाचे काम नगरपरिषदेने पूर्ण केले. यामुळे रस्ता आता चकाचक आणि खड्डेमुक्त झाला आहे.
रविवारी (ता. ८) रात्री दहा वाजल्यापासून ते सोमवारी (ता. ९) रात्री बारापर्यंत पुलावरील रस्त्याच्या डांबरीकरणासाठी वाहतूक आळंदी नगरपरिषदेने पूर्णतः बंद केली होती. स्वतः नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, मुख्याधिकारी माधव खांडेकर आणि अन्य नगरसेवक या रस्त्याच्या कामाची पाहणी करीत होते. वाहतुकीच्या वर्दळीचा रस्ता असल्याने हे काम चांगले होणे आवश्यक होते. त्याचबरोबर सांडपाणी रस्त्यावर येऊ नये यासाठी ड्रेनेजचीही दुरुस्ती नगरपरिषदेने केली. दिवसभरात या मार्गावर वाहतूक बंद केल्यामुळे वाहन चालकांची काहीशी गैरसोय झाली मात्र रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने वाहतुकीसाठी चांगला रस्ता वापरता येईल असे चित्र सध्यातरी आहे.
नवनिर्वाचित नगरसेवकांकडून प्राधान्य
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेत पुणे-आळंदी रस्त्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र नगरपरिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे निविदा प्रक्रिया पूर्ण करता आल्या नाहीत. मात्र, नागरिकांची आणि वाहतूक करणाऱ्या वाहनांची गैरसोय होऊ नये यासाठी रस्ता करणे गरजेचे होते. प्रशासन आणि नवनिर्वाचित नगरसेवकांनी प्राधान्य देऊन रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण केले. उर्वरित रस्त्याचे काम हे निविदा प्रक्रिया केल्यानंतर केले जाईल, असे नगरपरिषदेकडून सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

