आळंदीत आज महाद्वार नूतनीकरण शिलापूजन

आळंदीत आज महाद्वार नूतनीकरण शिलापूजन
Published on

आळंदी, ता. १२ : संत ज्ञानेश्वर माउलींच्या संजीवन समाधी मंदिराच्या पुढील भागातील मुख्य महाद्वाराच्या नूतनीकरणाच्या कामाचा शिलापूजन समारंभ शुक्रवारी (ता. १३) सायंकाळी पाच वाजता होणार आहे. हा कार्यक्रम आळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाच्या आवारात आयोजित केला आहे.
याबाबत आळंदी देवस्थानने माहिती दिली की, संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिराच्या दर्शनी भागातील मुख्य महाद्वाराचे दगडी बांधकाम काहीसे कमकुवत झाले होते. यामुळे नव्याने बांधकाम करणे गरजेचे असल्याने महाद्वार पूर्णपणे दगडी घडीव बांधकाम करण्याचे देवस्थाने निर्णय घेतला. या दगडी बांधकामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २६ ऑक्टोबर रोजी केले होते. अंदाजे पाच कोटी खर्च या कामासाठी अपेक्षित आहे. संपूर्ण बांधकाम दगडामध्ये केले जाणार असून, शिलापूजनाच्या कार्यक्रमानंतर दगडाचे घडीव काम सुरू केले जाणार आहे. त्यानंतर महिनाभरामध्ये दगडी बांधकाम आणि वरचा मजला आकर्षक कोरीव लाकडी कामात केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com