

आळंदी, ता. १२ : आळंदी नगर परिषदेच्या वतीने इंद्रायणी नदी आणि दगडी घाटवर शुक्रवारी (ता. १३) स्वच्छता अभियान आयोजित केले आहे. नगरपरिषद नवनिर्वाचित नगरसेवक आणि प्रशासनाच्या साथीला या अभियानामध्ये अंदाजे अडीच ते तीन हजार भाविक, नागरिक व विद्यार्थी सहभागी होणार असून, हा उपक्रम लोकसहभागातून राबविण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी माधव खांडेकर आणि नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांनी दिली.
इंद्रायणी घाट परिसर स्वच्छतेसाठी शहरातील वारकरी शिक्षण संस्था आणि संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान कमिटी सहभागी होत आहे. संपूर्ण अभियान ४ गटांमध्ये विभागून राबविण्यात येणार आहे. यामध्ये चाकण चौक (पुलाच्या उजव्या बाजूस) २ पथके, इंद्रायणी घाट परिसर २ पथके, कार्यरत राहणार आहेत. उपलब्ध यंत्रसामग्रीमध्ये चार पोकलेन मशीन, दोन जेसीबी, सहा डंपर, पाच ट्रॅक्टर, पाच घंटा गाड्या असणार आहेत. स्वच्छता दूतांना २०० मास्क, २००९ हँड ग्लोज, १०० खोरे, १०० पावडे, १०० कुदळ, १०० पाट्या व ५०० कॅरीबॅग कचरा संकलनासाठी देण्यात येणार आहे. या अभियानाचा उद्देश इंद्रायणी नदी स्वच्छ ठेवणे, जनजागृती करणे व नागरिकांमध्ये नदी संवर्धनाची भावना दृढ करणे, हा आहे. सर्व सहभागी नागरिकांनी नियोजनानुसार उपस्थित राहून श्रमदान करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.