पुणे विभागात आळंदी नगरपरिषद चौथी

पुणे विभागात आळंदी नगरपरिषद चौथी
Published on

आळंदी, ता. १७ : आळंदी नगरपरिषदेला राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियान स्पर्धेत पुणे विभागामध्ये चौथा क्रमांक मिळाला असून ७५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे. पर्यावरण संवर्धनाच्या विविध घटकांमध्ये केलेल्या नियोजनबद्ध आणि परिणामकारक कामगिरीमुळे हा सन्मान मिळाला आहे.
मुख्याधिकारी माधव खांडेकर म्हणाले की, राज्य शासनामार्फत दरवर्षी घेण्यात येणाऱ्या या अभियानात भूमी, वायू, आकाश, जल आणि अग्नी या पंचमहाभूतांशी संबंधित कामांचे सखोल मूल्यमापन केले जाते. स्थानिक स्वराज्य संस्थांनी पर्यावरणपूरक उपक्रम राबवून शाश्वत विकास साधण्यावर भर दिला जातो. या मूल्यमापनात हवेची गुणवत्ता सुधारणेत वृक्षारोपण, वाहन प्रदूषण नियंत्रण, हरित क्षेत्र वाढवणे आणि स्वच्छ ऊर्जेचा वापर यांचा विचार केला. तर पाणी संवर्धनात पावसाचे पाणी साठवण, जलस्रोत स्वच्छता आणि पाणी पुनर्वापर उपक्रम या बाबींचा विचार केला, घनकचरा व्यवस्थापनात प्लॅस्टिक निर्मूलन, स्वच्छता मोहीम, कंपोस्टिंग आणि जमिनीचे संरक्षण याचा विचार तर ऊर्जाबचतीत सौरऊर्जा, एलईडी वापर आणि पर्यायी ऊर्जास्रोतांचा प्रचार आणि जैवविविधता संवर्धनाबाबत स्थानिक वनस्पती-प्राणी संरक्षण, जैवविविधता उद्याने आणि निसर्ग संवर्धन या बाबत विचार करून परीक्षण करण्यात आले होते. या सर्व घटकांमध्ये आळंदी नगरपरिषदेकडून राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे गुणांकन करण्यात आले आणि त्यानुसार पुणे विभागात चौथा क्रमांक निश्चित करण्यात आला. हा सन्मान शहराच्या पर्यावरणपूरक वाटचालीसाठी मोठा टप्पा ठरत असून भविष्यातही अशाच उपक्रमांना चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com