आळंदी टेम्पोची दुचाकी स्वरांना धडक एक जखमी

आळंदी टेम्पोची दुचाकी स्वरांना धडक एक जखमी
Published on

टेम्पोच्या धडकेमध्ये दुचाकीस्वार जखमीआळंदी, ता. १९ : आळंदी नगरपरिषद हद्दीत बुधवारी (ता. १८) सकाळी दहाच्या सुमारास भरधाव टेम्पोची समोरून येणाऱ्या दोन दुचाकीस्वारांना धडक बसली. यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीस्वार लक्ष्मण नामदेव कुबडे (वय ५५, रा. जगन्नाथ पार्क, पद्मावती रस्ता, आळंदी) यांच्या डाव्या मांडीचे हाडास गंभीर दुखापत झाली आहे.
अपघातप्रकरणी टेम्पोचालक भरत उत्तम शिंदे (वय ३२, रा. कडदे, ता. खेड) यांच्यावर आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अपघाताची घटना आळंदीतील प्रभाग क्रमांक सात, गुंडरे गल्लीमध्ये घडली. याबाबत फिर्याद दुचाकीस्वार कुबडे यांनी आळंदी पोलिस ठाण्यात दिली. आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेम्पोचालक भरत शिंदे चाकण रस्त्यावरून घुंडरे गल्लीमध्ये शहरात प्रवेश करत असताना समोरून येत असलेल्या दोन दुचाकीस्वारांना टेम्पोची (एमएच १४ एमटी ७६३०) धडक दिली. त्यामध्ये दुचाकीस्वार (एमएच २१ एएफ ७९४९) कुबडे यांना गंभीर दुखापत झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com