आळंदी देवस्थानकडून वारकऱ्यांच्या शंकांचे निरसन

आळंदी देवस्थानकडून वारकऱ्यांच्या शंकांचे निरसन

Published on

आळंदी, ता. १ : संत ज्ञानेश्‍वर महाराज संजीवन समाधी मंदिरातून माउलींच्या चांदीच्या चल पादुका अन्यत्र नेण्यास कधीही कोणालाही परवानगी दिलेली नाही. तसेच पादुका आळंदीतील संजीवन समाधी मंदिरातून कोठेही बाहेर सार्वजनिक सप्ताहासाठी गेलेल्या नाहीत. अशा आशयाचे मजकूर आळंदी देवस्थाने सोशल मीडियाद्वारे पोस्ट करत वारकऱ्यांचे शंका निरसन केले आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाच्या सप्ताहासाठी माउलींच्या पादुका दर्शनासाठी येणार आहेत, तसेच आलेल्या आहेत. अशा प्रकारचे निवेदन देवस्थान वगळता खासगी लोकांकडून केले जात आहे. यामुळे आळंदी देवस्थानला भाविकांची दिशाभूल होऊ नये यासाठी निरसन करावे लागले. आळंदी देवस्थान कडून सांगण्यात आले की, ‘‘माउलींच्या चल पादुका आषाढी वारीमध्ये पंढरपूरला विठ्ठल भेटीसाठी जातात, तसेच आळंदीत नगर प्रदक्षिणेसाठी देऊळवाड्याच्या बाहेर पडतात. त्या अन्यत्र कोठेही नेल्या जात नाहीत, किंवा दिल्या जात नाहीत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com