आळंदीच्या दुय्यम निबंध कार्यालयात एक दिवस महिला राज
आळंदी, ता. ६ : सशक्त महिला, सक्षम समाज अंतर्गत महिलांचा सन्मान, प्रगतीची नवी ओळख या आशयाखाली जागतिक महिला दिनानिमित्त पुणे शहरातील दुय्यम निबंध कार्यालयासह हवेली तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये दुय्यम निबंधक म्हणून महिला कर्मचारी काम करणार आहेत.
याबाबतचे पत्र सह जिल्हा निबंधक वर्ग तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, पुणे शहर यांनी काढले आहे. ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्ताने महिलांचा सन्मान करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलेचे अधिकार तसेच त्यांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय गौरवासाठी हा महिला दिन साजरा केला जातो.
यानिमित्त पुणे शहरातील ११ सह जिल्हा निबंधक कार्यालय आणि हवेली तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये निबंधक म्हणून महिला कर्मचारी काम करतील. महिला दिनानिमित्त काही दस्त नोंदणीसाठी स्वीकारले जातील. यामध्ये महिला खरीददाराच्या लाभातील खरेदीखत, करारनामे, दस्तऐवजांची नोंदणी शासनाच्या अधिसूचनेनुसार मुद्रांक शुल्कामध्ये एक टक्का सवलत ध्येय असलेले सर्व प्रकारचे दस्तऐवज नोंदवले जातील.
महिला पक्षकारांच्या मृत्युपत्राचा दस्त, महिला पक्षकारांच्या लाभातील कुलमुखत्यार पत्राचा दस्त आणि ज्या दस्तांमध्ये महिला पक्षकार असतील ओळख देणाऱ्या महिला वकील असतील असे सर्वसाधारण दस्तऐवज नोंदविले जाणार आहेत. महिलांना मालमत्ता हक्क व कायदेशीर सक्षमीकरणाच्या दृष्टीने प्रोत्साहन देणे हा या उपक्रमामागे मुख्य उद्देश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

