आळंदीत स्वच्छतेसाठी रांगोळीचा उपक्रम
आळंदी, ता. ८ : बेशिस्त नागरिकांकडून वारंवार उघड्यावर कचरा टाकला जातो. नगरपरिषदने त्या तेरा ठिकाणी रांगोळी काढून स्वच्छतेचा संदेश देत त्या जागांचे सुशोभीकरण करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमामागील उद्देश नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करणे तसेच शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांचा सहभाग वाढविणे हा आहे.
आळंदी नगरपरिषदेमार्फत शहरात दैनंदिन घंटागाडीच्या माध्यमातून घरगुती कचरा संकलनाची नियमित व्यवस्था करण्यात आली आहे. तरीदेखील काही नागरिकांकडून आपल्या सोयीनुसार सार्वजनिक ठिकाणी तसेच उघड्यावर कचरा टाकला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यापूर्वी अशा प्रकारे उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर नगरपरिषदेच्या पथकांमार्फत दंडात्मक कारवाई केली होती. मात्र अपेक्षित प्रमाणात सुधारणा दिसून आलेली नाही. यामुळे मरकळ रस्ता डीपी, जनाबाई धर्मशाला, मरकळ चौक, चावडी चौक, प्रदक्षिणा रस्ता, चायनीज सेंटर जवळ प्रदक्षिणा रस्ता, घुंडरे अळी चौक, वडगाव रस्ता सुलभ शौचालय शेजारी, चाकण चौक, वाय जंक्शन, केळगाव रस्ता, सुलभ शौचालया जवळ पूर्ण फूटपाथ, केळगाव बायपास, सिद्धबेट रस्ता, पुलावरती अशा विविध ठिकाणी रांगोळी काढण्यात आली आहे.
आळंदी नगर परिषदेमार्फत ज्या ठिकाणी वारंवार उघड्यावर कचरा टाकला जातो, त्या ठिकाणी रांगोळी काढून स्वच्छतेचा संदेश देत त्या जागांचे सुशोभीकरण करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमामागील उद्देश नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करणे तसेच शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांचा सहभाग वाढविणे हा आहे.
- माधव खांडेकर, मुख्याधिकारी, आळंदी नगरपरिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

