

आळंदी, ता. ८ : खेड तालुक्यातील सोळू खिंड येथून सायकल वरून घरी जात असताना झालेल्या अपघातात सायकल स्वार शालिकराम (वय ४२, भदई कोरो रागावपूर फैजाबाद, उत्तर प्रदेश, सध्या रा. पिंपळगाव, ता. खेड) यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत दाखल करण्यात आले आहे.
ही घटना सोळूखिंड येथे रविवारी (ता. १) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. याबाबत आळंदीतील पोलिस हवालदार ए. व्ही. गोरड यांनी यांनी फिर्याद दिली आहे. आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सालीकराम हे उत्तर प्रदेश वरून रोजंदारीसाठी पिंपळगाव खेड येथे आले होते. कामावरून घरी जात असताना त्यांच्या सायकलचा अपघात झाला आणि त्यामध्ये ते जखमी झाले. जखमी झाल्यानंतर त्यांना आळंदी येथील खासगी रुग्णालयामध्ये प्रथम उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे प्रतिसाद देत नसल्याने पुढे पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये दाखल केले मात्र ते मयत झाले. शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचा मृतदेह त्यांचा भाऊ मुन्नीलाल यांच्या ताब्यात देण्यात आला. या अपघाताबाबत आळंदी पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मयत दाखल करण्यात आले असून अधिक तपास आळंदी पोलीस करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.