आळंदी परिसरात सुळसुळाट
आळंदी, ता. १७ : आळंदी शहरातील विविध भागांत भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिक, महिला आणि बालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या समस्येवर उपाय म्हणून नगरपरिषदेने सिद्धबेट येथे भटक्या प्राण्यांचे जन्म नियंत्रण केंद्र कार्यान्वित केले आहे.
शहरात भटक्या कुत्र्यांची निश्चित आकडेवारी नगरपरिषदेकडे नाही. शहरातील मंदिर परिसर, वडगाव रस्ता, चऱ्होली रस्ता आणि इंद्रायणी घाटावर १० ते १५ कुत्र्यांची टोळकी (कळप) वावरत आहेत. चावडी चौक आणि देहू फाटा परिसरात सकाळी व रात्रीच्या वेळी पादचारी तसेच वाहनचालकांच्या अंगावर कुत्रे धावून जाण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे अनेकांनी सकाळचे फिरणे बंद केले असून, किरकोळ चावा घेण्याच्या घटनाही घडल्या आहेत.
कुत्र्यांना मूळ परिसरात सोडले
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आळंदी नगरपरिषदेने वैज्ञानिक पद्धतीने नसबंदी व लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. सिद्धबेट येथील केंद्रात तज्ज्ञ पशुवैद्यकांमार्फत शस्त्रक्रिया आणि रेबीज प्रतिबंधक लसीकरण केले जात आहे. उपचारानंतर कुत्र्यांना पुन्हा त्यांच्या मूळ परिसरात सोडले जाते. ॲनिमल वेल्फेअर बोर्डाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हा उपक्रम राबविला जात असल्याची माहिती मुख्याधिकारी माधव खांडेकर, नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांनी दिली.
उद्देश
भटक्या कुत्र्यांची अनियंत्रित वाढ मानवतावादी पद्धतीने कमी करणे
रेबीज व इतर संसर्गजन्य रोगांवर नियंत्रण ठेवणे
नागरिकांची सुरक्षितता व सार्वजनिक आरोग्य सुधारणे
प्राण्यांबाबत संवेदनशील व कायदेशीर उपाययोजना राबवणे
शहरातील स्वच्छता व शाश्वत व्यवस्थापनाला हातभार लावणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

