पत्नीला मारहाण प्रकरणी पतीवर आळंदीत गुन्हा

पत्नीला मारहाण प्रकरणी
पतीवर आळंदीत गुन्हा
Published on

आळंदी, ता. २८ : दारू पिऊन पत्नीला शिवीगाळ आणि जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यामध्ये पती उज्ज्वल ठाकरे (रा. ३८, रा. चिखली, ता. हवेली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना शुक्रवारी (ता. २७) आळंदीतील तनिष्क विलास सोसायटीमध्ये रात्री साडेनऊच्या दरम्यान घडली. याबाबत पत्नी माला ठाकरे (वय ३३, रा. चिखली, ता हवेली) यांनी आळंदी पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली. याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले, उज्ज्वल ठाकरे यांनी दारू पिऊन फिर्यादी माला ठाकरे यांना शिवीगाळ करीत सिमेंटच्या विटेचा तुकडा त्यांच्या डोक्यात मारला. तसेच, त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत आळंदी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com