भक्ती सोपान पूल अखेर जमीनदोस्त

भक्ती सोपान पूल 
अखेर जमीनदोस्त
Published on

आळंदी, ता. १ : येथे आषाढी कार्तिकी वारीत मुख्य दर्शन बारीसाठी आणि नागरिकांच्या दैनंदिन पायी चालण्यासाठी इंद्रायणी नदीवर अनेक वर्षे उभा असलेला भक्ती सोपान पूल अखेर जमीनदोस्त करण्यात आला.
आळंदी शहरातील इंद्रायणी नदीवर भक्ती सोपान पूल संत ज्ञानेश्वर माउलीच्या संजीवन समाधी मंदिरात दर्शनाचा मध्यम मार्ग होता. आषाढी आणि कार्तिकी वारीमध्ये इंद्रायणीच्या पलीकडे देहू फाटा हद्दीत दर्शन मंडप उभारलेला असायचा. तेथील भाविकांना मंदिरात येण्यासाठी या पुलाचे रचना केली होती. मात्र, काहीसा कमकुवत झाल्याने हा पूल प्रशासनाने काढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जेसीबीच्या साह्याने संपूर्ण पूल जमीनदोस्त केला. त्याचा नदीपात्रात पडलेला राडाराडा जेसीबीच्या माध्यमातून काढण्याचे काम सुरू आहे. त्याला पर्यायी म्हणून राज्य तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून पुंडलिक मंदिरालगतच नव्याने पूल बांधला आहे. त्यामुळे भाविकांची सोय कायम आहे.
याबाबत नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे आणि नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सांगितले की, मागील आठ महिन्यांपासून भक्ती सोपान पूल वापरास बंद केला होता. आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाअंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी सदर धोकादायक पूल पाडण्यासंदर्भात निर्देश दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com