

आळंदी, ता. १ : जुन्या भांडणाच्या वादातून मरकळ (ता. खेड) येथे दोन गटांत तुफान हाणामारी झाली. याप्रकरणी आळंदी पोलिसांनी दोन्ही गटांतील १२ जणांवर गुन्हे दाखल केले असून, यात चार अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. राड्यादरम्यान पाच दुचाकींची तोडफोड करण्यात आली.
मरकळ येथील चौकात सोमवारी (ता. ३०) रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. महादेव वैजनाथ देडे आणि ज्ञानेश्वर ऊर्फ बबलू महादेव पाचपुते यांनी परस्परविरोधी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या वादातून दोन्ही गट समोरासमोर आले. वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन आरोपींनी लाकडी दांडक्यांनी एकमेकांना मारहाण केली. यावेळी कोयते हवेत फिरवून दहशत माजवण्यात आली, तर दगडफेकीत तीन दुचाकी व दोन बुलेटचे सुमारे ९० हजार रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी महादेव देडे, शेखर शिंदे, गणेश लोखंडे, ज्ञानेश्वर पाचपुते, भूषण घेणंद, दीपक भुसे, भूषण वरपे, मयूर पाचपुते यांच्यासह चार अल्पवयीन मुलांवर गुन्हे दाखल झाले आहेत. रात्रीच्या या राड्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. पुढील तपास आळंदी पोलिस करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.