केळगावातील दुहेरी खुनातील आरोपीस अटक

केळगावातील दुहेरी खुनातील आरोपीस अटक
Published on

आळंदी, ता. ३ : खेड तालुक्यातील केळगाव ठाकरवाडी येथील वृद्ध महिला आणि सहा वर्षांच्या मुलीच्या दुहेरी खून प्रकरणाचा छडा लावण्यात आळंदी पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी विनायक तुकाराम भवारी (वय ३२, रा. सिन्नर) याला आळेफाटा येथून अटक करण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. २) मध्यरात्री मंगल शिंदे आणि धनश्री केदारी (वय ६) यांचा राहत्या घरी खून झाला होता. आरोपी विनायक भवारी आणि धनश्रीची आई संगीता केदारी यांनी दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. मात्र, कौटुंबिक वादामुळे ते महिनाभरापासून वेगळे राहत होते. आरोपी वारंवार घरी येत असल्याने मंगल शिंदे त्याला जाब विचारत असत, तर चिमुरडी धनश्रीही त्याला विरोध करत असे. याच रागातून आरोपीने गुरुवारी मध्यरात्री प्रथम मंगल शिंदे यांच्यावर हल्ला केला. यावेळी धनश्रीने आरडाओरड केल्याने आरोपीने तिचाही गळा आवळून खून केला. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अवघ्या सहा तासांत आरोपीला आळेफाटा परिसरातून ताब्यात घेण्यात आले. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, आळंदी पोलिस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com