

आळंदी, ता. १० : आळंदी-मरकळ रस्त्यावरील पोली बॉण्ड कंपनीसमोर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीवर आळंदी पोलिसांनी शुक्रवारी (ता. १०) पहाटे तीनच्या सुमारास कारवाई केली. पोलिसांनी पाच दरोडेखोरांना अटक केली असून, त्यांच्याकडून ८ लाख ४४ हजार ९६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जण फरार आहेत.
मोहम्मद इब्राहिम अनीस चौधरी (वय १९), जीशान साहिल खान (वय १८), जमाल अशीकली हस्मि (वय १९), शिवकुमार निरंजन चव्हाण (वय १८, सर्व रा. कुदळवाडी, चिखली मूळ उत्तर प्रदेश ) आणि सलमान जुबेर बागवान (वय १९, रा. चिंचवड, मूळ रा. सिद्धेश्वर टेकडी सोलापूर ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर फरान खान, अरबाज सहा, वसीम मन्यार आणि रहमान खान (सर्व रा. कुदळवाडी) हे फरार झाले आहेत. पोलिस शिपाई संदीप दोडके यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी धारदार कोयता, मिरची पावडर, नायलॉन दोरी आणि मोबाईलसह दबा धरून बसले होते. पोलिसांनी छापा टाकून पाच जणांना ताब्यात घेतले, तर चौघे अंधाराचा फायदा घेऊन पळाले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली गाडी आणि शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. पोलिस उपायुक्त मारुती जगताप, सहाय्यक आयुक्त सचिन कदम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके यांनी घटनास्थळी भेट दिली. आळंदी पोलिस पुढील तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.