आळंदीत उघड्या विहिरींवर संरक्षक जाळ्या

आळंदीत उघड्या विहिरींवर संरक्षक जाळ्या
Published on

आळंदी, ता. १७: भाविक व नागरिकांची सुरक्षा लक्षात घेऊन आळंदी नगरपरिषदेने इंद्रायणी नगर येथील धोकादायक विहिरीवर संरक्षक जाळी बसवली आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने ही पावले उचलली असून, या विहिरीला पांढरा रंग देऊन त्यावर स्वच्छतेचा संदेशही देण्यात आला आहे.
इंद्रायणी नगर भागात रस्त्याला लागूनच दोन विहिरी असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला होता. उपनगराध्यक्षा सुजाता तापकीर आणि गटनेते सचिन गिलबिले यांनी नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे व मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्याकडे याबाबत लेखी मागणी केली होती. प्रशासनाने याची दखल घेत एका विहिरीवर तातडीने जाळी बसवली असून दुसऱ्या विहिरीचे काम प्रलंबित आहे. याचबरोबर या विहिरींच्या बाजूला विहीर असल्याबाबतचे फलक लावणी बाकी आहे.

जवळपास दहा ते बारा विहिरी
आळंदी नगरपरिषद हद्दीत आळंदी गावठाणात मध्यवर्ती ठिकाणी भागीरथी नाला आणि प्रदक्षिणा रस्त्यावर दोन्ही बाजूला धर्मशाळांमध्ये विहिरी आहेत. जवळपास दहा ते बारा विहिरींची संख्या असून या विहिरींना चांगलेच पाणी आहे. १९८७ ते १९९२ या कालावधीमध्ये पाण्याचा दुष्काळात या विहिरींचा आळंदीकरांना मोठा हातभार होता. पाण्याचे नैसर्गिक स्रोत भविष्यकाळाची सोय म्हणून जपण्याच्या दृष्टिकोनाने या विहिरींनाही संरक्षक जाळी बसवून त्याचे जतन करणे आवश्यक आहे.

7609

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com