

आळंदी, ता. २० : नगरपरिषद चौकात इंद्रायणी नदीवरील अरुंद पुलावर वाहतुकीस व रहदारीस अडथळा होईल, अशा पद्धतीने रिक्षा उभी केल्याप्रकरणी दोघा रिक्षा चालकांवर आळंदी पोलिस ठाण्यात रविवारी (ता. १९) गुन्हा दाखल केला आहे. बालाजी गोविंदराव मलंगे (वय ३०, रा. मोशी, ता. हवेली ) आणि दशरथ काशिनाथ अहिवळे (वय ३०, रा. लक्ष्मी नगर, येरवडा, पुणे), असे गुन्हा दाखल झालेल्या रिक्षाचालकांचे नाव आहे. ही कारवाई आळंदी शहरातील नगरपरिषद चौकात इंद्रायणी पुलावर बस थांब्याजवळ रविवारी (ता. २०) आळंदी दिघी वाहतूक पोलिसांकडून करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.