

आळंदी, ता. २६ : येथील ज्ञानेश्वर विद्यालयातील दोन विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या (एनएमएसएस) परिक्षेत यश संपादन करून शिष्यवृत्ती मिळवली आहे. विश्वजित साहू आणि नक्ष टोणपे या दोन्ही विद्यार्थ्यांना शासनाकडून दरवर्षी १२ हजार रुपये यांप्रमाणे ४ वर्षांसाठी एकूण ४८ हजार इतकी शिष्यवृत्ती मिळणार आहे. या परीक्षेसाठी विद्यालयातील १४८ विद्यार्थी बसले होते. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे विद्यालयाचा लौकिक वाढला आहे. संस्थेचे सचिव अजित वडगावकर, विद्यालयाचे प्राचार्य किसन राठोड, उपप्राचार्य प्रशांत सोनवणे, पर्यवेक्षिका अनिता पडळकर, हेमांगी उपरे, शिक्षक व पालकांच्या वतीने यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक व समन्वयक यांचे अभिनंदन करण्यात आले .
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.