राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबीरात रक्तदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबीरात रक्तदान
राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबीरात रक्तदान

राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबीरात रक्तदान

sakal_logo
By

आळेफाटा, ता. ९ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) येथील सितारंग चॅरिटेबल सोसायटीचे श्रीमती सीताबाई रंगुजी शिंदे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अळकुटी यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनाचे औचित्य साधून जांबुत येथे राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबीरात रक्तदान शिबीर घेण्यात आले. शिबीरासाठी डॉ. विखे पाटील फाऊंडेशनचे मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलचे समन्वयक रवींद्र माघाडे आणि त्यांच्या सहाकाऱ्यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी ६५ जणांनी रक्तदान केले. शिबीराच्या उद्‍घाटनप्रसंगी सीतारंग चॅरिटेबल सोसायटीचे अध्यक्ष एस. आर. शिंदे, सचिव व्हि. एस. शिंदे, खजिनदार आर. एस. शिंदे, शांताराम शिंदे, पांडुरंग तोतरे, जयसिंग जाधव, शुभांगी शिंदे, मीनल शिंदे, सारंग शिंदे, प्राचार्य प्रा. डॉ. टी. डी. गुंजाळ, जांबुतचे सरपंच दत्तात्रेय जोरी, माजी सरपंच बाबासाहेब फिरोदिया, पोपट फिरोदिया, उपसरपंच राणी बोऱ्हाडे, पत्रकार दत्ता उणवने, ज्येष्ठ पत्रकार संजय बारहाते, सुभाष जगताप, बाळु फिरोदिया, नाथा जोरी आदी उपस्थित होते.