आळे येथे शिक्षकाची विद्यार्थ्याला मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आळे येथे शिक्षकाची 
विद्यार्थ्याला मारहाण
आळे येथे शिक्षकाची विद्यार्थ्याला मारहाण

आळे येथे शिक्षकाची विद्यार्थ्याला मारहाण

sakal_logo
By

पुणे, ता. २१ : आळे (ता. जुन्नर) येथील एका महाविद्यालयातील शिक्षकाने विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
आळे येथील महाविद्यालयात शनिवारी (ता. २१) सकाळी मुलांच्या घोळक्यातील एका विद्यार्थ्याने शिक्षकांना पाहून शेरोशायरी केली. त्यामुळे शिक्षकाने एका विद्यार्थ्यास पकडून त्याला मारहाण केली होती. त्यावेळी विद्यार्थ्याने, ‘यामध्ये माझी चुक नाही,’ अशी वारंवार विनंती केली. मात्र, तरीही संबंधित शिक्षकाने त्यास मारहाण केली. हा प्रकार सुरू असताना एका विद्यार्थ्याने मोबाईलमध्ये घटनेचे चित्रीकरण केले. ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केली. त्यानंतर विद्यालयाच्या प्रशासनाने या घटनेची दखल घेतली असून, तातडीने बैठक बोलावली. तसेच, घटनास्थळी आळेफाटा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर यांनी भेट दिली. याबाबत सायंकाळी उशिरापर्यंत नोंद झालेली नव्हती.