
वडगाव येथील शिबिरात १५० महिलांची तपासणी
आळेफाटा, ता. १३ ः वडगाव कांदळी (ता. जुन्नर) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी आरोग्य शिबिराचे घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरात १५० महिलांची तपासणी करण्यात आली.
या प्रसंगी वडगाव कांदळीच्या सरपंच उल्का श्रीकांत पाचपुते, उपसरपंच संजय खेडकर, माजी सरपंच रामदास पवार, ग्रामपंचायत सदस्य जिजाभाऊ भोर, पंढरीनाथ पाचपुते, सचिन निलख, सुवर्णा मुटके, संगीता भोर, शायदा पठाण, सुजाता लांडगे, शुभांगी निलख, ग्रामविकास अधिकारी एम. बी. वाघे व ग्रामपंचायत कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, महिला बचत गट सदस्या, उन्नती महिला ग्रामसंघाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
शिबिर यशस्वी होण्यासाठी पिंपळवंडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम सोनटक्के, आरोग्य सहायक गणेश बेलोटे, अरुणा हांडे, नितीन निघोट, मंगेश साळवे, प्रतीक्षा केदार यांचे सहकार्य लाभले. यावेळी विविध क्षेत्रातील महिलांचा जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान करण्यात आला.