बाळासाहेब जाधव महाविद्यालयात
उद्योजकता विकास कार्यशाळा

बाळासाहेब जाधव महाविद्यालयात उद्योजकता विकास कार्यशाळा

आळेफाटा, ता. १६ ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व आळे (ता. जुन्नर) येथील ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ संचलित बाळासाहेब जाधव कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंडळ अंतर्गत एकदिवसीय जिल्हास्तरीय उद्योजकता विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.


कार्यशाळेचे उद्घाटन उद्योजक बाळासाहेब काकडे व बबन सहाणे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. प्रवीण जाधव, प्रा. संजय वाघचौरे, संस्थेचे अध्यक्ष अजय कुऱ्हाडे, उपाध्यक्ष सौरभ डोके, खजिनदार अरुण हुलवळे, मानद सचिव अर्जुन पाडेकर, बाळासाहेब जाधव, भाऊदादा कुऱ्हाडे, उल्हास सहाणे, जीवन शिंदे, देविदास पाडेकर, किशोर कुऱ्हाडे, बबनराव सहाणे, दिनेश सहाणे आदी मान्यवर उपस्थित होते.

पहिल्या सत्रात काकडे यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी उद्योजक होण्यासाठी कानमंत्र दिला. त्यात त्यांनी उद्योग व व्यवसाय करण्यासाठी लागणारी वेगवेगळी कौशल्य विद्यार्थ्यांसमोर मांडली.

दुसऱ्या सत्रात सहाणे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण हे नुसते नोकरी मिळविण्याचे साधन न समजता त्यातून योग्य उद्योग व व्यवसाय कसे करावे, याचे मार्गदर्शन करत व्यवसाय करण्यासाठी तल्लख बुद्धिमत्ता ही शिक्षणातून येते व यासाठी शिक्षणाची गरज आहे, असे मत त्यांनी मांडले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुषमा कदम यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. संकेत वामन यांनी, तर आभार प्रा. संतोष राठोड यांनी मानले.
-----------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com