फार्मसी महाविद्यालयात रॅगिंग प्रतिबंधावर मार्गदर्शन

फार्मसी महाविद्यालयात रॅगिंग प्रतिबंधावर मार्गदर्शन
Published on

आळेफाटा, ता. १२ ः आळे (ता.जुन्नर) येथील विशाल जुन्नर सेवा मंडळ, विशाल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासियूटिकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च या महाविद्यालयात लैंगिक शिक्षण, रॅगिंग प्रतिबंध यासारख्या संवेदनशील विषयांवर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आळेफाटा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे हे उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. डी. डी. गायकवाड, डॉ. थोरात, प्रा. जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी पोलिस निरीक्षक नलावडे यांनी विद्यार्थ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. चिंचवडे यांनी केले तर आभार प्रा. सोनाली पवार यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळाचे विशेष सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com