शेतकरी कुटुंबातील भावंडांची पोलिस दलात निवड

शेतकरी कुटुंबातील भावंडांची पोलिस दलात निवड

आळेफाटा, ता. २९ ः जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद या गावातील शेतकरी कुटुंबातील चार मुलांची पुणे शहर व रायगड पोलिस दलात निवड झाली. परिस्थितीने अतिशय गरीब असलेले विजय गाडेकर यांचे आपल्या चारही मुलांनी पोलिस दलात दाखल होऊन देशसेवा करावी असे स्वप्न होते. आज त्यांचे हे स्वप्न पूर्ण झाले असल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येत होता. यामध्ये सारीका गाडेकर ही सन २०११मध्ये तर आशा गाडेकर ही सन २०१४मध्ये व दीपक गाडेकर व अंकिता गाडेकर, सन २०२३मध्ये या चारही जणांची महाराष्ट्र पोलिस दलात नियुक्ती झाली आहे. या चारही भावंडांना पहिल्यापासूनच शालेय जीवनातून अभ्यासाची गोडी असताना मनात जिद्द होती की आपण काहीतरी करू शकतो. यासाठी त्यांचे शालेय शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव आनंद, उच्च शिक्षण बाळासाहेब जाधव महाविद्यालय आळे या ठिकाणी केले असून या चारही भावंडांना सह्याद्री करिअर ॲकॅडमीचे प्रशिक्षक मयूर डुंबरे, गीताराम गायकर व अनिकेत घोडेकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी प्रशिक्षण घेत विविध परीक्षांचा अभ्यास पूर्ण करत चारही भावंडांनी महाराष्ट्र पोलिस दलामध्ये भरती होऊन एक आदर्श समाजापुढे दाखवून दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com