राजुरी येथे कीटकनाशक रोग सर्वेक्षण

राजुरी येथे कीटकनाशक रोग सर्वेक्षण

Published on

आळेफाटा, ता. १८ : राजुरी (ता. जुन्नर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. टाके, डॉ. बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली गावठाण व इतर परिसरात कीटकनाशक रोग सर्वेक्षण करण्यात आले. तसेच या महिन्यात पावसाळ्याची सुरुवात होत असल्याने याबाबतची योग्य काळजी नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात प्रा. आरोग्य केंद्रांचे आरोग्य निरीक्षक एल. डी. ठोगीरे, आरोग्य सेवक सुरेश चौधरी, रूपाली नायकवडी सर्व आशासेविका यांनी मदत केली. या कामासाठी सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे सहकार्य लाभले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.