संतवाडी फाटा येथे दुचाकीस्वारास कार ने धडक दिल्याने एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी

संतवाडी फाटा येथे दुचाकीस्वारास कार ने धडक दिल्याने एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी

Published on

संतवाडी येथे अपघातात
एकाचा जागीच मृत्यू

आळेफाटा, ता.१८ : पुणे- नाशिक महामार्गाच्यावरील संतवाडी फाटा (ता. जुन्नर) येथे जाणाऱ्या दुचाकीला पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव मोटारीने समोरून जोरदार धडक दिली. यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीवरील एकजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी (ता. १७) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात सुरेश जेडगुले (वय ५८) यांचा जागीच मृत्यू झाला तर अनिल निमसे गंभीर हे जखमी झाला आहे.
आळेफाटा पोलिस स्टेशन कडुन मिळालेल्या माहितीनुसार अनिल निमसे व सुरेश जेडगुले हे आपल्या दुचाकीवरून घरी संतवाडी (ता.जुन्नर) जात असताना नाशिककडून पुण्याच्या दिशेने समोरून येणाऱ्या मोटारीने दुचाकीला जोराची धडक दिली. जखमीवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. रमेश जेडगुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोटारचालक गणेश वाघमारे याच्याविरुद्ध आळेफाटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक संजय शिंगाडे हे करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.