

आळेफाटा, ता.२८ : आळेफाटा (ता. जुन्नर) परिसरातील आळे, राजुरी, उंचखडक, बोरी, जाधववाडी आदी गावांना वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीच्या पावसाने झोडपले. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या राजुरी, उंचखडक भागास आमदार अतुल बेनके भेट दिली व पिकांची शेतावर जाऊन पाहणी केली.
यावेळी आमदार बेनके म्हणाले की, गारपीट होऊन शेती पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या शेतातील द्राक्षे, डाळिंब, कांदा, गहू, ज्वारी, ऊस, कोबी, फ्लॉवर, मका, चारा पिके इतर रब्बी हंगामातील पिके, भाजीपाला, फळबाग यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रांताधिकारी, तहसीलदार यांना दिले आहेत.
पाहणीप्रसंगी उंचखडकचे माजी उपसरपंच अजय कणसे, जयसिंग औटी, पांडुरंग हाडवळे, दत्तात्रेय हाडवळे, सुरेश बोरचटे, बी.टी. डुंबरे, राजेंद्र मावळे, तुकाराम डुंबरे आदी उपस्थित होते.
03800
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.