आळेफाटा बाजारात कांद्याला २१० रुपये बाजारभाव

आळेफाटा बाजारात कांद्याला २१० रुपये बाजारभाव

आळेफाटा, ता. १० : येथील उपबाजारात शुक्रवार (ता. ८) कांद्याच्या २२ हजार ७३२ पिशवीची आवक झाली. एक नंबर कांद्यास दहा किलोला २१० रुपये बाजारभाव मिळाला आहे अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे, संचालक प्रीतम काळे, सचिव रूपेश कवडे व व्यवस्थापक प्रशांत महाबरे यांनी दिली.

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा या ठिकाणी झालेल्या मोढयांत एक नंबर कांद्यास दहा किलोस १९० ते २१० रुपये बाजारभाव मिळाला तर दोन नंबर कांद्यास १५० ते १९० बाजारभाव मिळाला‌‌. तीन नंबर गोल्टी कांद्यास १२० ते १५० रुपये बाजारभाव मिळाला तर चार नंबर बदला, चिंगळी कांद्यास दहा किलोस ३० ते १०० रुपये बाजारभाव मिळाला.


दरम्यान केंद्र सरकारने कांद्याची निर्यात चालु केल्याने गेल्या दोन महिन्यांपासून स्थिर असलेला बाजारभावात थोडीफार वाढ झालेली आहे अशी माहिती सचिन डावखर, सचिन जाधव, चेतन कुऱ्हाडे, गोविंद डावखर, सलमान तांबोळी, शरीफ पटेल, आरिफ पटेल, रंगनाथ घोडेकर, पापा मोमीन, शौकत भाई, परवेझ भाई, मोसीन भाई, संजय कुऱ्हाडे, विजय कुऱ्हाडे, अनिल गडगे, शिवप्रसाद गोळवा, ज्ञानेश्वर गाढवे या व्यापाऱ्यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com