आळेफाटा येथे कांदा १७५ रुपये दहा किलो

आळेफाटा येथे कांदा १७५ रुपये दहा किलो

आळेफाटा, ता.२९ : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा येथील उपबाजारात रविवारी (ता.२९) कांद्याच्या ४ हजार ८१९ पिशवींची आवक झाली. बाजारात एक नंबर गोळा कांद्यास दहा किलोला १७५ रुपये बाजारभाव मिळाला आहे.
बाजारातील मोढ्यांत एक नंबर कांद्यास दहा किलोस १६० ते १७५ दोन नंबरला १२० ते १६०, तीन नंबर गोल्टीस ५० ते १२० तर चार नंबर बदला, चिंगळी कांद्यास दहा किलोस ५० ते ८० रुपये बाजारभाव मिळाला, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे, संचालक प्रीतम काळे, सचिव रूपेश कवडे व व्यवस्थापक प्रशांत महांबरे यांनी दिली.
दरम्यान, येथील बाजार समितीत या आठवड्यात कांद्याची आवक कमी झालेली आहे. बाजारभावात किलोलो २ ते ३ रुपये बाजारभावात वाढ झाली, अशी माहिती संतोष कुऱ्हाडे, विजय कुऱ्हाडे, अनिल गडगे, शिवप्रसाद गोळवा, ज्ञानेश्वर गाढवे, संदीप कोरडे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com