आळेफाटा परिसरात शांततेत मतदान

आळेफाटा परिसरात
शांततेत मतदान

आळेफाटा, ता. १३ : या परिसरातील आळे, आळेफाटा, कोळवाडी, संतवाडी, राजुरी, उंचखडक, वडगाव आनंद, पादीरवाडी, बोरी बुद्रुक, माळवाडी, जाधववाडी, भोरवाडी, नगदवाडी, वडगाव कांदळी या गावांमध्ये शांततेत मतदान झाले. सकाळी मतदान चालु झाल्यानंतर काही प्रमाणात गर्दी झाली होती. त्यानंतर दुपारी एक ते दोन वाजेपर्यंत अतिशय कमी गर्दी मतदान केंद्रावर होती. दुपारी दोन नंतर चांगली गर्दी वाढली. यामध्ये विशेष करून महिला मतदारांचा सहभाग होता.

दरम्यान आळे गावात मतदान केंद्र क्रमांक २०२ हे युवा संचालित मतदान केंद्र म्हणून जाहीर केले आहे. या मतदान केंद्रावर सर्व मतदान अधिकारी हे युवा असून सकाळपासूनच युवा मतदारांनी मोठ्या संख्येने रांगा लावत या ठिकाणी मतदान केले असून यामध्ये तरुणींचे प्रमाण तरुणांच्या तुलनेत अधिक असल्याचे दिसून आले.या युवा संचलित मतदान केंद्राच्या व्यवस्थेसाठी रवींद्र सबनीस, सुधीर वाघमारे, स्वप्नील दप्तरे, गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर तालुका स्वीप आयकॉन प्रा.जयसिंग गाडेकर,तलाठी विशाल इंगळे, कर्मचारी बाळासाहेब शितोळे यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com